Mumbai, एप्रिल 28 -- Weather News: राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळाले. आज कोकणच्या तापमानात (Konkan Temperature) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, गेले काही दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तर, बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवत...