Mumbai, एप्रिल 27 -- Maharashtra weather update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदललं असून दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमा होऊन पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाच्या शिडकावामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळं पिकांचे मोठं नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने (Weather update ) पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसासह काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.

Weather Updates: मुंबई, ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यांत उष्णता वाढणार; १० जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून पुन्हा (IMD) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्...