North korea, मे 3 -- Virgin Girls Pleasure Squad: हुकूमशहा किम जोंग ऊन दरवर्षी २५ व्हर्जिन मुलींशी लैंगिक संबंध ठेवत असल्याची माहिती उघड झाली असून या साठी खास प्लेजर स्क्वॉड चालवले जाते. या प्लेजर स्क्वॉड मधून पळून आलेल्या एका महिलेने अनेक गंभीर आरोप किम जोंग उनवर केले आहे. येओनमी पार्क असे पळून आलेल्या महिलेचे नाव असून पार्कने सांगितले की, उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनसाठी चालवण्यात येणाऱ्या या प्लेजर स्क्वॉडच्या पथकाचे ३ गट आहेत.

पहिल्या गटाला मसाजचे प्रशिक्षण दिले जाते, दुसऱ्या गटाला किम जोंग उन आणि त्याच्या जवळच्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नृत्य आणि गाण्याचे प्रशिक्षण या प्लेजर स्क्वॉड मधील मुलींना दिले जाते. धक्कादायक म्हणजे, किम जोंग उन हा दरवर्षी २५ व्हर्जिन मुलींशी लैंगिग समांध ठेवत असल्याचे देखील पार्कने सांगितले.

उत्त...