Mumbai, फेब्रुवारी 17 -- Aamir Khan Post On Suhani Bhatnagar Death: 'दंगल' या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटात छोट्या बबिता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागर हिने आज (१७ फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला. सुहानी भटनागर हिच्या निधनाच्या बातमीने तिचा ऑनस्क्रीन बाबा अर्थात बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याला देखील मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून सुहानी भटनागर हिला श्रद्धांजली वाहिली आहे. आमिर खान याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुहानीसाठी पोस्ट लिहिली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करताना अभिनेता आमिर खान याने लिहिले की, 'सुहानीच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले. तिची आई पूजा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखात आम्ही सामील आहोत... इतकी प्रतिभावान तरुण मुलगी, एक चांगली...