भारत, फेब्रुवारी 7 -- निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रीवादीतील संघर्षाचा निवाडा करत शरद पवार गटाला मोठा धक्का देत राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. यानंतर शरद पवार गट काय करणार?त्यांच्यासमोर कोणते पर्याय?तसेच त्यांना कोणते चिन्ह आणि नाव मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती.

याबाबत आज निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून, यापुढे शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे नाव दिले. दरम्यान, हे नवीन नाव किती दिवस वापरता येणार, याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेले पत्रक मी वाचले असून यात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये नमूद केले आहे की, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी वन टाईम ना...