भारत, फेब्रुवारी 10 -- Maharashtracha Favourite Kon Stylist Icon: नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन' हा पुरस्कार अभिनेता रितेश देशमुखला मिळाल्याचे समोर आले आहे.

झी टॉकीज या वाहिनीच्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३ या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन' पुरस्कार रितेश देशमुखने पटकावला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षीही स्टाईल आयकॉन बनवण्याचा मान रितेशला मिळ...