Pune, मे 3 -- Pune Traffic Update : पुण्यात मेट्रोची कामे वेगात सुरू आहे. पुण्यातील पुणे विद्यापीठ मार्गावरील आणि गणेशखिंड रस्त्यावरील टाटा मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात आले असून या मेट्रो स्थानकाच्या कामासाठी गर्डर लॉचिंगचे कामे केली जाणार आहे. त्यामुळे आज वेधशाळा चौक परिसरात शनिवारपासून (३ मे) पासून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या बदलांची दखल घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेकेचे काम वेगाने सुरू आहे. हे काम सिमला ऑफिस चौकापासून सुरू करण्यात आले आहे. शिवाजीनगर स्थानक, वीर चापेकर चौक, वेधशाळा चौकातील वाहतूक सुरळीत राहावी या हेतूने आज पासून या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकाच्या कामासाठी गर्डर लॉचिंगचे कामे केली जाणार असून हे काम पूर्ण होईपर्यंत य...