Pune, एप्रिल 29 -- Pune Traffic Change due PM Narendra Modi Sabha: पुण्यात आज, बारामती, शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी रेस कोर्स येथे सभा होत असल्याने वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. येथे होणारी गर्दी पाहता दुपारनंतर लष्कर, तसेच या परिसरातील काही रस्ते वाहतुकीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तर वाहने पार्क करण्यासाठी देखील जागा नेमून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात आज रेसकोर्स येथे मोदी यांची सभा होत आहे. त्यामुळे येथील पाणी टाकी ते ट...