Mumbai, मे 6 -- NBFC FD Rates : फिक्सड डिपॉझिट (Fixed Deposits) अर्थात मुदत ठेव ही आजही सर्वसामान्यांसाठी भरवशाची गुंतवणूक आहे. गुंतवणुकीचे नवनवे पर्याय उपलब्ध असतानाही एफडीतील गुंतवणूक कमी झालेली नाही. एफडीवरील व्याज बँक आणि वित्तीय संस्थेनुसार बदलत असते. जोखीम घेण्याची क्षमता असल्यास बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) उत्तम पर्याय ठरू शकतात. सध्या आघाडीच्या पाच वित्तीय कंपन्या एफडीवर ७ टक्क्यांपेक्षाही अधिक व्याज देत आहेत.

बजाज फिनसर्व्ह

ही कंपनी विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे १८, २२, ३३ आणि ४४ महिन्यांवर जास्त व्याज दर देते. हा व्याजदर वार्षिक ७.४० टक्के ते ८.२५ टक्के इतका आहे. १८ महिन्यांच्या एफडीवर ७.८ टक्के व्याज मिळते. २२ महिन्यांच्या एफडीवर ७.९ टक्के व्याज मिळते. ३३ महिन्यांच्या एफडीवर व्याजदर ८.१० टक्के आणि ४४ महिन्यांच्या एफडीवर जा...