Nagpur, एप्रिल 29 -- Airport Bomb Threat News: नागपूरसह (Nagpur) जयपूर (Jaipur), कानपूर (Kanpur), गोवा (Goa) यासह देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवून देणारा मेल आला. या धमकीच्या मेलनंतर विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला. नागपूर विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास त्यांना धमकीचा ईमेल आला. विमानतळ संचालक आबिद रुई यांच्या मेल आयडीवर हा ईमेल आला. विमानतळाच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या धमकीच्या ईमेलची तक्रार विमानतळ प्रशासनाने नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात केली. विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली.

हा बनावट ईमेल असल्याचा पोलिसांना संशय असून अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे बनावट ईमेल असून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशा...