Mumbai, एप्रिल 28 -- Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र धनु राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

आजच्या चंद्र गुरू षडाष्टक योगात किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले...