भारत, मे 8 -- आंबा हे फळ जवळपास सर्वांच्या आवडीचे आहे. फळांचा राजा म्हणून ओळख असलेले हे फळ वर्षातून एकदाच बाजारात उपलब्ध असते. या फळाची जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वजण आंबे आनंदाने व आवडीने खाताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का आंबे खाण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. अनेकजण आंबे पाण्यात ठेवतात. पण किती वेळ हा आंबा पाण्यात ठेवावा असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया त्याविषयी...

अनेकजण कोणतीही काळजी न घेताच आंबा खाताना दिसतात. पण आंबा तसाच खाणे हे शरीरासाठी योग्य नाही. आयुर्वेद एक्सपोर्ट दीक्षा भावसार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबा खाण्यापूर्वी कोणती काळजी घेणे गरजेचे असते हे सांगितले आहे. आंबा खाण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवणे गरजेचे आहे. त्याचा शरीराला मोठा फायदा ह...