Mumbai, एप्रिल 28 -- Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!

संतू खूप मोठमोठ्यानं रडत असतो.

अतू - काय झालं.? का रडतोयस रे?

संतू - अरे काय सांगू?

अंतू - सांग, मन मोकळं करून टाक

ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय,

तिच नावच आठवत नाहीये!

...

शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो.

बंड्याचं इंग्रजी कच्चं असल्यामुळं गुरुजी नेहमी त्यालाच पकडतात.

आजही तसंच झालं.

गुरुजी - बंड्या, मी तुझा जीव घेईन

याच इंग्रजीत भाषांतर कर.

बंड्या - ते इंग्रजी गेलं उडत.

तुम्ही हात तरी लाऊन बघा.

.

शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो.

गुरुजी - गण्या It कधी वापरतात?

संप्या - घर बांधताना.!

(गुरुजींनी संप्याची चंपी केली!)

(टी...