Mumbai, मे 1 -- Investors kyc : केवायसी (Know Your Customer) पूर्ण न केल्यामुळं सेबीच्या कक्षेत येणाऱ्या सुमारे ११ कोटी गुंतवणूकदारांपैकी सव्वा कोटीहून अधिक खाती ठप्प झाली आहेत. केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सीनं (KRA) ही कारवाई केली आहे. त्यामुळं संबंधित गुंतवणूकदारांना स्टॉक, म्युच्युअल फंड आणि कमोडिटीजमध्ये व्यवहार करू शकत नाहीत.

पाच केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सींनी संयुक्तपणे एक तपशीलवार परिपत्रक जारी केलं आहे. अनेक गुंतवणूकदारांचे केवायसी अद्याप पॅन आणि आधारसह अपडेट केले गेले नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं विविध श्रेणींमध्ये केवायसीचं पुनर्वर्गीकरण करण्याची गरज निर्माण झाली. यापैकी बरेच केवायसी युटिलिटी बिले (वीज, टेलिफोन), बँक खात्याचे तपशील इ. सारख्या कागदपत्रांचा वापर करून केले गेले होते. सेबीच्या नियमानुसार ही कागदपत्रं केवायसीसाठी वैध...