Mumbai, मे 4 -- IMD High wave Alert : अलीकडं हवामानात सातत्यानं बदल होताना दिसून येत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेनं जिवाची काहिली होत असतानाच मुंबई महापालिकेनं एक नवी बातमी दिली आहे. पुढच्या ३६ तासांत समुद्राच्या भरतीच्या वेळी उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस (INCOIS) यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार, शनिवार, ४ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून ते रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत उंच लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या लाटांमुळं किनारपट्टीच्या परिसरात तसंच, सखल भागांमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट...