Mumbai, मे 4 -- Export duty on Onion news : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांदा निर्यातबंदीवरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच केंद्र सरकारनं कांद्याच्या बाबतीत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केलं आहे.

देशात कांद्याचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नुकताच सरकारनं देशी हरभऱ्याच्या आयात शुल्कात ३१ मार्च २०२५ पर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेल्या 'बिल ऑफ एंट्री'द्वारे पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवरील शुल्कातील सूट देखील वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा: केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

'बिल ऑफ एंट्री' हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. हा दस...