Delhi, एप्रिल 20 -- tesla ceo Elon Musk cancels his visit to india : भारत सरकारने अलीकडेच नवीन इलेक्ट्रिक वाहन उत्पादन धोरण जाहीर केले आहे. यानुसार भारतात मेक इन इंडिया अंतर्गत टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याची घोषणा करण्यासाठी एलॉन मस्क भारतात येणार होते. मस्क हे २१ आणि २२ एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा हा नियोजित दौरा रद्द झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांचा भारत दौरा पुढे ढकलला आहे. इलॉन मस्क त्यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार होते व भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या प्रवेशाची घोषणा देखील करणार होते.

इलॉन मस्क यांनी त्यांचा दौरा का रद्द केला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. १० एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X वर त्यांच्या ...