भारत, मे 8 -- हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन झाले आहे. संगीत सिवन यांनी आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये अभिनेता तुषार कपूरच्या 'क्या कूल है हम' चित्रपटाचा देखील समावेश आहे. तसेच रितेश देशमुखच्या 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटाचे दिग्दर्शनही संगीत सिवन यांनी केले होते. आता संगीत सिवन यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

संगीत सिवन यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. संगीत सिवन हे ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वा...