Mumbai, मे 8 -- Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज शास्त्रानुसार, नक्षत्रांच्या बदलाणे सौभाग्य योग आणि किस्तुघ्न करण जुळून येत आहेत. तसेच अमावस्या वर्ज्य दिनमान असल्याने राशीवर मोठा परिणाम दिसून येणार आहे. आज चंद्र अहोरात्र मेष आणि वृषभ राशीतून भ्रमण करणार आहे. या सर्व बदलांचा धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असेल. दुग्धशर्करा योगाचा उत्तम फायदा मिळेल. नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार मनात येऊ शकतो. मात्र कोणत्याही व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत अथवा आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील लोकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ कराल. तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव इतरांवर निश्चितच राहील....