भारत, एप्रिल 27 -- मराठी इंडस्ट्रीला सध्या सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहेत. एकापाठोपाठ एक असे वेगवेगळ्या विषयांवर आधारित सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. २०२३ हे वर्ष तर मराठी इंडस्ट्री आणि कलाकारांसाठी खास ठरले. या वर्षात एकापाठोपाठ एक हिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमधील 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आता घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार...

बाईपण भारी देवा चित्रपटाने २०२३ हे वर्ष चांगलेच गाजवले होते. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमा पाहिला आणि त्यावर भरभरुन प्रेम केले. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सर्व अभ...