भारत, मे 9 -- छोट्या पडद्यावरील मालिका हे प्रेक्षकांसाठी नेहमीच करमणूकीचे साधन ठरत असतात. तसेच या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचताना दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून केली आहे. त्यामध्ये प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि इतर काही कलाकारांचा समावेश आहे. अभिनेता सुबोध भावे देखील 'तुला पाहाते रे' या मालिकेत काम करताना दिसला होता. आता सुबोध पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

अभिनेता सुबोध भावेची 'तुला पाहाते रे' ही मालिका तुफान हिट ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा त्याची नवी मालिका येत आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुबोध सोबत या मालिकेत 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार म...