Pune, फेब्रुवारी 10 -- शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवकअभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्यांचा मारेकरी मॉरिस यानेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मुंबईतील दहिसरमध्ये घडलेल्या या घटनेने राज्यात खळबळ माजली असून राजकीय वातावरण तापलं असतानाच अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. शनिवारी सायंकाळआर्थिक कारणावरुन एकासराफ व्यवसायिकाने आपल्या दुकान मालकावर भर चौकात गोळीबार करून नंतर स्वत:ही आत्महत्या केली. ही घटना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलजवळ शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

अनिल ढमाले (वय ५२, रा. बालेवाडी) असेगोळीबार केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या घटनेत आकाश गजानन जाधव (वय ४२, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

हे ही वाचा -Mauris Noronha: अभिषेक घोसाळ...