भारत, मे 9 -- बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. या शोमध्ये सहभागी होणारे कलाकार हे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात. त्यांचे बिग बॉसच्या घरातील वागणे हे कायमच प्रेक्षकांच्या मनात लक्षात राहाते. आता बिग बॉस मराठीमधील अभिनेत्री वीणा जगताप ही छोट्या पडद्यावरील एका मालिकेत एण्ट्री करणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. आता तिच्या आगामी मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

अभिनेत्री वीणा जगताप ही कलर्स मराठीवरील 'रमा राघव' मालिकेत दिसणार आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आय...