भारत, मे 8 -- 'सबसे कातिल गौतमी पाटील' हे अगदी लहानलहान मुलांच्या तोंडूनही ऐकायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मादक अदा आणि डान्सने वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचे लाखो चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना दिसते. आता गौतमीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गौतमी 'द महाराष्ट्र फाइल्स' या आगामी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज देखील पाहायला मिळणार आहे.

संजीवकुमार राठोड दिग्दर्शित 'द महाराष्ट्र फाइल्स' या चित्रपटात गौतमी पाटील एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. नेहमी पारंपरिक लूकमध्ये दिसणारी गौतमी एका डान्स गर्लची भूमिका साकारणार आहे. ती चित्रपटात एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.वाचा: बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्...