Mumbai, फेब्रुवारी 9 -- Abhishek Ghosalkar Shot Died In Mumbai: मुंबईच्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार यांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी महाराष्ट्राने कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणे धक्कादायक आणि सुन्न करणारे आहे, असे आदित्य ठाकरेंनी ट्विट केले आहे.

अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसा...